कोरोनाचे आणखी दोन बळी; 13 जणांचा मृत्यू तर रुग्णसंख्या 343

रत्नागिरी:- गुरुवार सायंकाळपासून प्राप्त झालेल्या अहवालामध्ये 9 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 343 इतकी झाली आहे. तर कोरोनाने आणखी दोन जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत कोरोनाने 13 जणांचा बळी घेतला आहे. 
कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. वाढत्या रुग्ण संख्ये सोबत मृत्यूचे प्रमाण देखील वाढत आहे. गुरुवारी प्राप्त अहवालात दोन दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या 2 जणांचा समावेश आहे, त्यामुळे एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता 13 झाली आहे. आतापर्यंत 125 रुग्णांना बरे झाल्यावर घरी सोडण्यात आले आहे.
रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या 198 इतकी आहे.आज पॉझिटिव्ह आलेल्या इतर 6 रुग्णांना दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.