कोरोनाने घेतला आणखी एक बळी; मृतसंख्या 11 तर बधितांची संख्या 334 वर

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाने आणखी एक बळी घेतला आहे. उपचाराखाली असलेल्या एका रुग्णाचा बुधवारी मृत्यू झाला असून त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. गुरुवारी आणखी 13 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे जिल्ह्याची कोरोना बधितांची संख्या 334 वर पोचली आहे. 
 

गुरुवारी प्राप्त अहवालात 13 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत यातील एकाचा मृत्यू बुधवारी झाला. प्राप्त पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये गुहागर येथील 2, कळंबणीतील 4, कामथे 3, रत्नागिरी 1 आणि संगमेश्वर येथील 3 पॉसिटीव्ह रुग्णांचा समावेश आहे. नवे 13 रुग्ण सापडल्याने जिल्हयातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 334 वर पोचली आहे. आतापर्यंत 5 हजार 914 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 

नव्याने चार रुग्णांना उपचाराअंती घरी पाठवण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत 125 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 11 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. रुग्णालयात 198 रुग्ण उपचाराखाली आहेत. जिल्हयात आलेल्या एकूण नागरिकांची संख्या 1 लाख 14 हजार 534 आहे. जिल्ह्यातून बाहेरच्या जिल्ह्यात तसेच परराज्यात गेलेल्या मजूर व इतरांची संख्या 43 हजार 663 आहे. जिल्ह्यात होम क्वारंटाईनखाली असलेल्यांची संख्या 77 हजार 732  इतकी आहे.