जिल्ह्यात आणखी 12 जणांना कोरोना; रुग्णसंख्या 319 वर

रत्नागिरी:- जिल्ह्यात आणखी 12 जणांचा कोरोना अहवाल पॉसिटीव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या 319 वर पोचली आहे. यासह बुधवारी 47 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

बुधवारी मिळालेल्या 12 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये कामथे येथील 8, मंडणगड 1, संगमेश्वर 3 रुग्ण आहेत तर तब्बल 47  रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहे. उपचारानंतर बरे झालेल्या चार रुग्णांना बुधवार घरी सोडण्यात आले यामुळे एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 124 इतकी झाली आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंत एकूण 319 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत, तर 5 हजार 767 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 358 अहवाल येणे बाकी आहे. जिल्हयात आलेल्या एकूण नागरिकांची संख्या 1 लाख 13 हजार 363 आहे. जिल्ह्यातून बाहेरच्या जिल्हयात तसेच परराज्यात गेलेल्या मजूर व इतरांची संख्या 41 हजार 03 आहे.

जिल्ह्यात होम क्वारंटाईनखाली असलेल्यांची संख्या आता झपाट्याने कमी होण्यास सुरुवात झाली आहे.  आज होम क्वारंटाईनखाली असलेल्यांची संख्या   77 हजार 732 आहे. तर संस्थात्मक क्वारंटाईन खाली असणाऱ्यांची संख्या 180 आहे.