मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन
रत्नागिरी:- जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू करण्यात येणाऱ्या विषाणू प्रयोगशाळेचे उद्घाटन रविवार 7 जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने होईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
कोरोना साठीच्या स्वॅबचे नमुने सध्या मिरज आणि कोल्हापूर मध्ये पाठविण्यात येत आहे. या कामात गती यावी, यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी या प्रयोगशाळेसाठी मंजुरी दिली आहे. या प्रयोगशाळेच्या उभारणीसाठी 1 कोटी 7 लाख रुपये खर्च आलेला आहे व याचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे.
मुंबईत मुख्यमंत्र्यांसमवेत आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री अँड. अनिल परब आणि प्रधान सचिव प्रदीप व्यास हे उपस्थित राहणार असून रत्नागिरीत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत उपस्थित असतील.