किनारपट्टी भागात लाटांचे तांडव; मिऱ्या किनाऱ्यावर बोट भरकटली

रत्नागिरी:- जिल्ह्यात निसर्ग वादळाने दणादाण उडवली आहे. वादळी वाऱ्यासह पावसाने जोर वाढवला आहे. यासोबत समुद्राला आलेल्या भरतीने किनारपट्टी भागात अजस्त्र लाटांचे तांडव सुरू झाले आहे. या लाटांच्या तडाख्यात मिऱ्या समुद्र किनाऱ्यानजिक नांगरून ठेवलेली नौका सापडली आहे. नर्मदा सिमेंट कंपनीची ही नौका असल्याचे वृत्त असून वादळी वारे आणि लाटांच्या तडाख्यात ही नौका भरकटली आहे. बुधवारी पहाटे पासून निसर्ग वादळाचा जोर वाढला असून किनारपट्टी भागात या वादळाचा जोर अधिक आहे. वादळा सोबत समुद्राला आलेल्या भरतीने किनारपट्टी भागात लाटांचे तांडव सुरू आहे. या तडाख्यात एक नौका सापडली आहे. ही नौका भगवती बंदर येथे नांगरून ठेवण्यात आली होती. मात्र लाटांच्या तडाख्यात ही नौका मिऱ्या किनाऱ्यानजिक पोहोचली आहे.