वादळाची वर्दी; वाऱ्यासह मुसळधार पाऊस

रत्नागिरी:- जिल्ह्यावर घोंघावणाऱ्या निसर्ग वादळाने जिल्ह्यात दाखल झाल्याची वर्दी दिली आहे. मंगळवारी 8 वाजल्यापासून जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. या वादळाचा जोर हळूहळू वाढण्याचा धोका असून बुधवारी पहाटे हे वादळ किनारपट्टी भागात धुमाकूळ घालण्याची भीती आहे. या कालावधीत वादळी वारे वाहण्याची भीती असून नागरिकांनी घराबाहेर पडू नये, किनारपट्टी भागातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.