रत्नागिरी:- दुचाकी-टेम्पोची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघतात ५ जण जखमी झाल्य्याची घटना मंगळवारी दुपारी हातखंबा येथे घडली.यातील जखमींना तत्काळ नरेंद महाराज संस्थांच्या रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार इब्राहिम नेवरेकर( वय-५१) व अरसालन अल्ताफ मुकादम (वय-१४) हे दोघे दुचाकीवरून रत्नागिरी ते लांजा असे निघाले होते.त्यांची दुचाकी हातखंबा गद्रे पेट्रोल पंपाचे समोर आली असता मुंबईहून कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोची धडक बसून अपघात झाला.
या अपघातात दुचाकी स्वार इब्राहिम नेवरेकर( वय-५१) व अरसालन अल्ताफ मुकादम (वय-१४)व टेम्पोतील अन्य तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले.या अपघाताची माहिती जगत गुरु नरेंद महाराज संस्थांच्या रुग्णवाहिकेवरील कर्मचार्यांना मिळताच जखमींना त्यांनी रुग्णवाहिकेतून तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची नोंद ग्रामीण पोलीस स्थानकात करण्यात आली असून पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत.