जिल्ह्यात कोरोना बधितांचे त्रिशतक

रत्नागिरी:- जिल्ह्यात नव्याने दहा जणांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. यामुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या तीनशेपार पोचली आहे.  

मंगळवारी सायंकाळी नव्याने 10 रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. यात कामथेतील 4, संगमेश्वर 2, रत्नागिरीत 1, दापोली 2 आणि राजापूरातील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 5 हजार 722 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.बरे झालेल्या रुग्णांची संख्या 120 वर पोचली आहे. तर आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 168 जण उपचारखाली आहेत.

जिल्ह्यात आलेल्या एकूण नागरिकांची संख्या 1 लाख 10 हजार 20 इतकी आहे. जिल्ह्यात होम क्वारंटाईनखाली असलेल्यांची संख्या 78 हजार 92  इतकी आहे. तर संस्थात्मक क्वारंटाईन खाली असणाऱ्यांची संख्या 173 आहे.