कोरोनाचा दहावा बळी; आणखी दहा जणांना कोरोनाची लागण

रत्नागिरी:-  सोमवारी आलेल्या अहवालात आणखी 10 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यापूर्वी मयत झालेल्या रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने कोरोना बळींची संख्या दहा झाली आहे.तर जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 297 वर पोचली आहे.

सोमवारी रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयाकडे मिरज येथून अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 9 रुग्ण संगमेश्वर येथील रुग्णालयात दाखल आहेत तर एका रुग्णाचा मृत्यू 30 मे रोजी झाला असून त्याचा अहवाल सोमवारी रात्री प्राप्त झाला आहे.
 

यापूर्वी मृत झालेल्या रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने आतापर्यंत कोरोनाने मृत्यू पावलेल्या रूग्णांची संख्या आता 10 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 116 वर पोचली आहे.