रत्नागिरी:- जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या नियमित वाढत आहे. रविवारी सायंकाळी 14 रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्यानंतर सोमवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालांनुसार आणखी 18 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 287 वर पोहोचली आहे. दरम्यान, सोमवारी सापडलेले 18 नवीन रुग्णांपैकी रत्नागिरी 7, कळंबणी 8, गुहागर 1, राजापूर 2 येथील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 100 जण कोरोना मुक्त झाले आहेत हीच जिल्हावासीयांसाठी दिलासादायक बाब आहे.
संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आलेल्यांचे स्वॅब नमुने घेण्यात आले असून, त्यांचे अहवाल येऊ लागले आहेत. नियमित अहवालामध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडत आहेत. रविवारी सायंकाळी 14 रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्यानंतर सोमवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालांनुसार आणखी 18 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 287 वर पोहोचली आहे. दरम्यान, शनिवारी सापडलेले 18 नवीन रुग्णांपैकी रत्नागिरी 7, कळंबणी 8, गुहागर 1, राजापूर 2 येथील आहेत.