जिल्ह्यात आज आणखी 14 कोरोना बाधित;एकूण रुग्णसंख्या 170 वर
रत्नागिरी:- रविवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आणखी 14 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे रुग्णसंख्या वाढून 270 वर पोचली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, रत्नागिरी येथे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या आता 07 वर पोचली आहे.
मिरज येथून 122 अहवाल जिल्हा रुग्णालयाकडे प्राप्त झाले. यामध्ये 14 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर 107 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटीव्ह आलेल्या अहवालांमध्ये रत्नागिरीतील 4 अहवाल, लांजा 3, गुहागर 3, कामथे 3 आणि दापोलीतील 1 रुग्णांचा समावेश आहे. यातील 04 रुग्ण कोव्हीड केअर सेंटर रत्नागिरी येथे दाखल आहेत