रत्नागिरी :-जिल्ह्यात मृतावस्थेत सापडणाऱ्या डॉल्फिनचा विषय दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे. गुहागर आणि दापोली पाठोपाठ आता रत्नागिरीतील चवंडे वठार येथे मृत डॉल्फिन सापडला आहे. रविवारी सकाळी समुद्रकिनारी येथील नागरिकांना डॉल्फिन मृतावस्थेत आढळून आला.
जिल्ह्याच्या किनारपट्टीवर डॉल्फिन मासे मृतावस्थेत आढळून येत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आठवडाभरात दापोलीतील पाळंदे आणि सालदुरे गावच्या किनाऱ्यावर दोन डॉल्फिन मासे मृतावस्थेत आढळल्याने त्यांच्या मृत्युचं कारणाचा शोध घेतला जात असताना आता रत्नागिरीतही मृत डॉल्फिन सापडला आहे.
कोकणात डॉल्फिनचा मृत्यू चिंतेचा विषय ठरत आहे. गुहागर आणि दापोलीत दोन महिन्यांत सहा डॉल्फिन माशांचा मृत्यू झाला आहे. या माशांचा मृत्यू कोणत्या व्हायरसमुळे झाला आहे की डॉल्फिन माशांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने मृत्यू होत आहेत याबाबतचा शोध आता घेतला जात आहे.