जिल्ह्यात गेल्या काही तासांत 26 कोरोना बाधित; रुग्ण संख्या 234 वर
रत्नागिरी:- शनिवारी सकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असताना आणखी एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत सहाजणांचा बळी घेतला आहे. तसेच जिल्ह्यात गेल्या काही तासांत 26 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यानंतर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 234 झाली आहे.
शनिवारी मृत झालेला रुग्ण 18 मे रोजी मुंबईहून आला होता व 22 तारखेला रुग्णालयात भरती झाला होता. 23 मे रोजी याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. या रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत होता. या रुग्णाचा आज सकाळी मृत्यू झाला आहे. मात्र सकाळपासून या रुग्णाच्या नातेवाइकांशी संपर्क झाला नसल्याची माहिती रुग्णालयाकडून मिळत आहे. बाधितांचा अंत्यविधी रत्नागिरीत करण्यावरून काहीजण विरोध करीत असून आतातरी प्रशासन ठाम भूमिका घेणार का ? याकडे नागरिकांचे लक्ष आहे.