रत्नागिरी:- कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पोलिस यंत्रणा अलर्ट असलेली आपल्याला नेहमीच पाहायला मिळत आहे. डिवायएसपी गणेश इंगळे व ग्रामीण पोलिस निरिक्षक सुरेश कदम व तसेच रत्नागिरी पंचायत समिती गटविकास अधिकारी तुकाराम जाधव यांनी नुकतीच उक्षी गावाला भेट दिली. या भेटीदरम्यान उक्षीमध्ये कोरोनाची नेमकी परिस्थिती काय आहे, ग्रामस्थ नेमक्या कशा पद्धतीने कोरोना आजाराबद्दल काळजी घेत आहेत याचा आढावा घेतला.
याचबरोबर मुंबईतुन गावात आलेल्या चाकरमान्यांची माहिती घेतली. उक्षी बनाचीवाडी येथे तब्बल १७४ क्वारंटाईन केलेल्या चाकरमान्यांची भेट घेऊन त्यांना योग्य ती काळजी घेण्यास सांगुन मोलाचे मार्गदर्शन व जनजागृती केली.ग्रामीण पोलिस निरिक्षक श्री. सुरेश कदम यांनी क्वारंटाईन केलेल्या चाकरमान्यांचा आत्मविश्वास वाढवुन त्यांना “आपल्याला कोरोनाला हरवायचेच आहे.तुम्हाला तुमच्या काळजीसाठी कॉरंटाईन केलेले आहे. घाबरुन जाऊ नका” असा मोलाचा सल्ला दिला. गावामध्ये स्थापन केलेल्या ग्राम कृती दलाचीही भेट घेतली. ग्राम कृती दल करत असलेल्या कामाचे विशेष कौतुक केले. यावेळी रत्नागिरी पंचायत समिती गटविकास अधिकारी तुकाराम जाधव यांनी विश्ष सुचना देऊन चाकरमान्यांची व सर्व ग्रामस्थांची काळजी घेण्यास सांगितली.
या सर्वांमध्ये सोशल डिस्टंन्स ठेऊन उक्षी ग्रामस्थ, ग्राम कृती दल यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
या केलेल्या मार्गदर्शनाबद्दल व दाखवलेल्या आपुलकीबद्दल उक्षी ग्रामस्थांनी आभार मानले. यावेळी आरोग्य कर्मचारी सौ. सातघरे व तसेच आरोग्य सुपरवायजर सौ. भालेकर, उक्षी गावचे सरपंच मिलिंद खानविलकर, उपसरपंच हरिश्चंद्र बंडबे व उक्षी ग्रामस्थ उपस्थित होते.