चिपळूण वैश्य समाज संस्थेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न

७० रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे केले रक्तदान.

चिपळूण:-येथील चिपळूण वैश्य समाज ,चिपळूण या संस्थेच्यावतीने आणि भक्तश्रेष्ठ श्री वालावलकर चॅरिटेबल ट्रस्ट डेरवण यांच्या विशेष सहकार्याने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन गुरुवार दिनांक २८ मे २०२० रोजी राधाताई लाड सभागृह ,वैश्य भवन चिपळूण येथे करण्यात आले होते.कोरोनाच्या गंभीर प्रसंगी सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक कोरोना रुग्णांना याचा उपयोग व्हावा या उदात्त हेतूने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी तब्बल ७० जणांनी रक्तदान करून समाजापुढे आदर्श निर्माण केल्याची भावना मान्यवरांनी बोलून दाखवली.
सकाळी १० वाजता संस्थेचे आधारस्तंभ श्री. सुचय रेडीज, विश्वस्त श्री. उदय गांधी, श्री. जगन्नाथ रेडीज,सल्लागार श्री. अनिल उर्फ बाबुराव खातू, श्री. शैलेश जागुष्टे तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री. पंकज कोळवणकर, सचिव श्री. अमोल टाकळे, उपाध्यक्ष प्रमोद गांगण, खजिनदार श्री. प्रतीक रेडीज तसेच कार्यकारणी सदस्य श्री. नयन साडवीलकर, श्री. नितीन गांधी, श्री. संतोष टाकळे, श्रीमती अश्विनी महाकाळ, श्री. प्रणय वाडकर तसेच वैश्य युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सिद्धेश लाड, चिपळूण युवक संघटनेचे अध्यक्ष श्री. सचिन साडवीलकर, महिला मंडळ अध्यक्षा सौ.उमा जागुष्टे ,वधू वर सूचक मंडळ अध्यक्ष श्री. जगदीश साडविलकर नगरसेवक श्री. आशिष खातू, नगरसेविका सौ. वर्षा जागुष्टे, सौ. रसिका देवळेकर, श्री. रत्नदीप देवळेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कोणत्याही प्रकारचे उद्घाटन न करता शिबिराला प्रारंभ झाला. रक्तदान शिबिराचे केंद्रबिंदू असलेल्या आणि १०० व्या वेळी रक्तदान करणारे व खास देवरुख वरून आलेले श्री. उदय उर्फ बंधू कोळवणकर यांचा संस्थेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. या शिबिरात चिपळूणकरांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत १३५ रक्तदात्यांची नोंदणी केली. यापैकी रक्तपेढीच्या मागणीनुसार आवश्यक आणि उपस्थित असलेल्या रक्तदात्यांन पैकी ७० जणांना संधी देण्यात आली.रक्तदात्यांनमध्ये निमंत्रित रक्तदाता खास देवरुख घेऊन आलेले प्रामुख्याने श्री. उदय उर्फ बंधू कोळवणकर, तसेच नगरसेवक श्री. आशिष खातू, श्री. रत्नदीप देवळेकर, उद्योजक श्री. मनोज भोजने श्री. सुनील सावर्डेकर श्री बंडाशेठ आवले, श्री. सचिन कोकाटे, श्री. प्रशांत देवळेकर, डॉक्टर श्री. गौरव गांगण, श्री. मल्लेश लकेश्री, श्री. निनाद देवळेकर, श्री. मंगेश वेसविकर, श्री. अशितोष गांधी, डॉ. रोहित सूर्यवंशी ,श्री बाबू चिखले, श्री. अतुल संसारे, श्री.जीशान कास्कर ,यांच्यासह अनेकांनी रक्तदान केले.
या शिबिराला माजी आमदार श्री. विनय नातू ,नगराध्यक्षा सौ. सुरेखा खेराडे, चिपळूण अर्बन बँकेच्या चेअरमन सौ. राधिका पाथरे, व्हाईस चेअरमन श्री. निहार गुढेकर, श्री मिलिंदशेट कापडी, नगरसेवक श्री.परिमल भोसले,माजी उपनगराध्यक्ष श्री. लियाकत शाह, माजी नगरसेवक संजय रेडीज, श्री. प्रवीण रेडीज, श्री. सतीश खेडेकर, श्री. राजन कुडाळकर ॲड श्री. दिलीप उर्फ भाऊ दळी, श्री. हेमंत शिरगावकर, श्री. श्रीकृष्ण खेडेकर, श्री. अमरीश उर्फ दादा खातू, श्री. राजन कोकाटे, श्री.प्रकाश गांगण, श्री. फैसल कास्कर, श्री. आल्हाद वरवाटकर, श्री. विनोद भोबस्कर, श्री. कालभैरव देवस्थानचे ट्रस्टी श्री. समीर शेटे, श्री. अमजद मुकादम, श्री. अभिजीत संसारे, श्री. विजय गांधी, श्री. नरेंद्र बेलवलकर, एबीपी माझाचे रत्नागिरीचे प्रतिनिधी श्री. रवींद्र कोकाटे, आपलं कोकणचे श्री. महेंद्र कासेकर श्री.दिगंबर सुर्वे यांनी सदिच्छा भेट दिली. तसेच अनेक चिपळूणकरांनी शिबिराला शुभेच्छा दिल्या. सदर शिबिराच्या यशस्वितेसाठी चिपळूण वैश्य समाज चिपळूण, चिपळूण वैश्य युवक संघटना, वैश्य महिला मंडळ, वधु-वर सुचक मंडळातील सर्व संचालक तसेच श्री. रामशेठ रेडीज, श्री. केतनशेठ रेडीज, श्री. बादल कोकाटे, श्री. प्रसाद खातू, श्री.अशितोष गांधी, श्री. दिगंबर सुर्वे, डॉक्टर ऋतुजा संतोष टाकळे, चिपळूण नगर परिषद, भक्तश्रेष्ठ वालावलकर चॅरिटेबल ट्रस्ट डेरवण यांचे अनमोल सहकार्य लाभले.अतिशय कमी कालावधीत नियोजनबद्ध कार्यक्रम संपन्न केल्याबद्दल संस्थेच्या वतीने अध्यक्ष श्री. पंकज कोळवणकर, सचिव श्री. अमोल टाकळे आणि रक्तदान शिबीर प्रमुख श्री. नयन साडविलकर यांनी सर्वांचे आभार मानले.