कोरोना काळात मुंबई-पुणे येथुन आलेल्या तरुणांनी कोकणात व्यावसायिक शेतीचा प्रयोग करावा-सुहास खंडागळे

गाव विकास समिती देणार मोफत व्यावसायिक शेती विषयक सल्ला

रत्नागिरी:- कोरोना काळात कोकणात जे तरुण मुंबई पुण्या हुन आले आहेत आणि ज्यांनी कोरटाईन काळ पूर्ण केला आहे अशा तरुणांनी शहरात जाण्यास वेळ असल्यास गावी व्यावसायिक शेती व येथील व्यवसायात लक्ष घालावे आणि कुटूंब सह आपल्या भागाच्या आर्थिक विकासात पुढाकार घ्यावा असे आवाहन गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी केले आहे.
सरकार लॉक डाऊन पूर्णतः उठवेल आणि तेव्हाच आपण बाहेर पडू याची वाट न पाहता आता लॉक डाऊन मध्ये ज्या सवलती मिळाल्या आहेत त्याचा उपयोग करून कोकणातील तरुणांनी कृषी व्यवसायात लक्ष घालावे.आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागणार आहे.शहरात जाण्यास वेळ असेल,तेथे जाऊन नोकरी बाबत ज्यांना अनेक प्रश्न निर्माण झाले असतील आणि ज्यांना शहरातून येऊन कोरटाईन काळ पूर्ण केला असेल तर अशा तरुणांनी येथे गावी आपल्या वडिलोपार्जित जमिनी मध्ये व्यावसायिक शेतीसाठी पुढाकार घेऊन लागवड करावी असे आवाहन सुहास खंडागळे यांनी केले आहे.अनेक चाकरमानी हे होळीला गावी आले होते ते आजही गावी आहेत अशा लोकांनी शेती व्यवसायात लक्ष घातले तर गावांची प्रगती होण्यास वेळ लागणार नाही.पावसाळा जवळ असून शेतीबाबतचे नियोजन वेळीच केल्यास त्याचा फायदा नक्की होईल असा विश्वास खंडागळे यांनी व्यक्त केला आहे.
गाव विकास समिती मार्फत मोफत मार्गदर्शन
कोकणात आर्थिक सुबत्ता येण्यासाठी येथे व्यावसायिक शेतीला चालना मिळणे आवश्यक असून ज्या प्रयोगशील तरुणांना शेती व्यवसाय करायचा आहे त्यांना गाव विकास समितीचे कृषी तज्ञ राहुल यादव यांच्या मार्फत फोनवरून मोफत व्यावसायिक शेतीचा सल्ला देण्यात येणार असल्याची माहिती सुहास खंडागळे यांनी दिली आहे.ज्या तरुणांना व्यावसायिक शेतीसंबधित मार्गदर्शन हवे असेल त्यांनी 9689163748 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन गाव विकास समिती,रत्नागिरी जिल्हा संघटने मार्फत खंडागळे यांनी केले आहे.