कोकणनगर पोलीस चौकी शेजारी तलवार, शिगा, लाठ्या काठ्या घेऊन राडा

रत्नागिरी:- कोकणनगर पोलीस चौकीशेजारीच हातात तलवार आणि लाठ्या-काठ्या, लोखंडी शिगा घेऊन एका गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी तब्बल २५ संशयितांविरोधात शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.
    जमाव करून शांतता भंग करत तलवार, काठी, लोखंडी शिगेचा वापर करत मारहाण केल्याप्रकरणी २५ संशयितांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची ही घटना बुधवारी रात्री कोकणनगर पोलिस चौकीजवळ घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील कोकण नगर पोलीस चौकी शेजारी बुधवारी रात्री मोठा जमाव जमला होता.हातात तलवारी, लाठ्या-काठ्या आणि लोखंडी शिगा घेऊन एकमेकांवर चाल करण्यात आली. जिल्हाधिकार्‍यांच्या मनाई आदेशाचे उल्‍लंघन करत  कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे जीवितास धोका असलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रसार होईल हे माहिती असूनही सार्वजनिक ठिकाणी गैरकायदा जमाव करुन हत्यारांचा वापर करत आरडा-ओरडा करत आपापसात तुफान हाणामारी केल्याची घटना बुधवारी रात्री कोकण नगर परिसरात घडली.या प्रकरणी पो.ना. राहुल घोरपडे यांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली असून या तक्रारीवरून पोलिसांनी इलियाज शेख (वय २४ , रा. मच्छीमार्केट, रत्नागिरी), सुफियान नागलेकर (रा. गवळीवाडा, रत्नागिरी), उबेद होडेकर (३३ , रा. उद्यमनगर, रत्नागिरी), सहिद खान ( ५२ , रा. कोकणनगर रत्नागिरी), आकिब काझी ( ३०, रा. गवळीवाडा, रत्नागिरी) व अन्य १५ संशयित यांच्या विरुध्द भा.द.वि.क भा.दं.वि.क. १४३,१४७,१४८,१४ ९ , २६ ९ , ३२३.१८८,१६०.५०४ सह भारतीय हत्यार कायदा ३/२५ . महाराष्ट्र पोलीस अधिनियम १ ९ ५१ चे कलम ३७ ( १ ) ( ३ ) चा भंग कलम १३५ , राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधि . २००५ चे कलम ५१ ( ब ) , साथीचा रोग प्रतिबंधक कायदा १८ ९ ७ मधील कलम ३ व कोव्हीड -१ ९ उपाययोजना २०२० चे कलम ११ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.