जिल्ह्यात 82 हजार जण होम क्वारंटाईन

रत्नागिरी:- जिल्ह्यातील होम क्वारंटाईनची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. मंगळवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्ह्यातील होम क्वारंटाईनची संख्या ८१७२७ वर पोहोचली होती तर संस्थात्मक क्वारंटाईन असणार्‍यांची संख्या १९३ वर पोहोचली आहे. 

संस्थात्मक क्वारंटाईन असलेल्यामध्ये जिल्हा रूग्णालय ५०, कामथे रूग्णालय ७, कळंबणी रूग्णालय ११, गुहागर रूग्णालय ४, दापोली रूग्णालय ४, तहसील दापोली ४, तहसील खेड ६६, तहसील रत्नागिरी ३०, तहसील संगमेश्‍वर २, तहसील गुहागर ७, तहसील राजापूर ८ असे मिळून १९३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

जिल्ह्यात येण्यासाठी ४६ हजार ९१९ अर्ज तर जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी ५८ हजार ३५३ अर्ज प्राप्त झाले आहेत.मंगळवारी सायंकाळी 27 अहवाल प्राप्त झाले असून हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. हे अहवाल कामथे येतील 12, रत्नागिरीतील 14 आणि राजापूर तालुक्यातील 1 अहवाल आहे.