रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मंगळवारी नव्याने 8 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असून जिल्ह्यातील कोरोना बधितांची संख्या 175 वर पोचली आहे. कोरोना बाधित आलेले आठ जण राजापूर तालुक्यातील तर कामथे येथील 6 जण आहेत.
जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. गेल्या दोन दिवसात 29 रुग्ण आढळून आल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारी तब्बल 14 जण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. 14 जण सापडल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण संख्या वाढून 175 इतकी झाली आहे.
दिवसेंदिवस वाढती रुग्ण संख्या जिल्ह्याची चिंता वाढवत असून पुन्हा एकदा प्रशासनाने लाॅकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मुंबईतुन आलेले चाकरमानी यांची संख्या सर्वाधिक असून त्यांना जिल्ह्यात आल्यानंतर क्वारंटाईन करण्यात आले आहे.