रत्नागिरी:- सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास 10 अहवाल जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. या दहा अहवालांपैकी 5 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. नव्या अहवालानुसार कोरोना बाधित रुग्ण संख्या 161 वर पोचली आहे. कोरोना बाधित रुग्णसंख्या दररोज वाढत आहे. सोमवारी आणखी 5 नवे रुग्ण कोरोना बाधित आले आहेत. यापैकी 1 रत्नागिरी तर 4 गुहागर येथील आहेत. येणाऱ्या कालावधीत कोरोना बाधित रुग्णसंख्या वाढण्याची भीती आहे.