पावस मार्गावर टेम्पो- दुचाकी धडकेत एक ठार

रत्नागिरी :- रत्नागिरी- पावस रस्त्यावरील कुर्ली फाटा येथे अॅपे टेम्पो आणि दुचाकीत समोरासमोर धडक होऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री १०.४५ वा. सुमारास घडली. याबाबत शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

अल्ताफ हसन भाटकर ( ४१, रा.जुना फणसोप, रत्नागिरी ) असे अपघातात मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. याबाबत जुना फणसोपचे पोलिस पाटील शादाब अब्दुल मजीद मुकादम ( ३७ , रा.जुना फणसोप, रत्नागिरी ) यांनी शहर पोलिसांना खबर दिली आहे . त्यानुसार, रविवारी रात्री अल्ताफ भाटकर आपल्या ताब्यातील दुचाकी ( एमएच- ०८- एल- ०८०१ ) वरुन घरी जात होते. ते कुर्ली फाटा येथे आले असता समोरुन येणाऱ्या अॅपे टेम्पो ( एमएच- ०८- एक्यू- १७८६ ) ला त्यांच्या दुचाकीची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात भाटकर यांचा मृत्यू झाला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस उपिनिरीक्षक सकपाळ करत आहेत .