रत्नागिरी:- जिल्ह्यात येण्यासाठी 46 हजार 413 तर जिल्हयातून बाहेर जाण्यासाठी अर्जांची संख्या 57 हजार 318 इतके अर्ज प्राप्त झाले आहेत. जिल्हयात शनिवारी होम क्वारंटाईन असणाऱ्यांची संख्या 69 हजार 799 वर पोहचली असून संस्थात्मक क्वारंटाईन खाली असणाऱ्यांची संख्या 193 आहे.
संस्थात्मक क्वारंटाईन असणाऱ्यांमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय येथे 37, उपजिल्हा रुग्णालय कामथे 9, उपजिल्हा रुग्णालय कळबणी 23, ग्रामीण रुग्णालय दापोली 4, ग्रामीण रुग्णालय संगमेश्वर १,तहसिलदार दापोली 5, तहसिलदार, खेड 49, तहसिलदार रत्नागिरी 28, तहसिलदार गुहागर 12, तहसिलदार राजापूर 25 असे मिळून एकूण 193 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.
जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत असून शनिवारी रात्री उशिरा १३ नव्या रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या हि १४५ वर पोहचली आहे.शनिवारी रात्री आलेल्या अहवालांमध्ये रत्नागिरीचे ८, चिपळूण २, संगमेश्वर, २, राजापूर १ असे मिळून १३ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
प्रशासने दिलेल्या माहिती नुसार शनिवारी रात्री आलेल्या अहवालांमध्ये रत्नागिरीत नवे ८ रुग्ण हे कोरोना पॉझिटीव्ह सापडले आहेत. हे रुग्ण मुंबई रिटर्न असून त्यांना शहरात क्वारंटाईन केले होते.त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांना क्वारंटाईन सेंटरमधून जिल्हा रुग्णालयातरातोरात दाखल करण्यात आले.या आठ जणांमध्ये ३ महिला व ५ पुरुषांचा समावेश आहे.
रत्नागिरीत जे आठ रुग्ण सापडले आहेत हे त्यातील चार रुग्ण हे हरचेरी, भोके व करबुडे गावचे असून हे सर्व मुंबईतून गावी आले होते. रेडझोन मधून आल्याने या सर्वाना क्वारंटाईन करण्यात आले होते.त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. शनिवारी रात्री त्यांचे अहवाल हे पॉझिटीव्ह आले आहेत.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार संगमेश्वर तालुक्यात २ नवे कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. हे दोघेही मुंबई रिटर्न असून त्यांचे अहवाल शनवारी रात्री पॉझिटीव्ह आले आहेत.त्यातील एक रुग्ण हा कळंबस्ते येथील असून दुसऱ्या रुग्णाचे नाव कळू शकले नाही.या दोघानाही आयसोलेशन कशात दाखल करण्यात आले आहे.
१४ अहवालांपैकी १३ पॉझिटीव्ह आले आहेत.त्यामध्ये चिपळूण येथील दोघांचा समावेश असून हे देखील चाकरमानी असल्याची माहिती पुढे आली आहे.त्यातील एकजण कामथे येथील तर दुसरा चिपळूण परिसरातील असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
शनिवारच्या अहवालामध्ये एक राजापूर येथील व्यक्ती कोरोना बाधित सापडला आहे. हा व्यक्ती खुद्द राजापुरातील असून त्याला कोरोनाची लागण झाल्याने त्याच्या प्रवासाची माहिती घेण्याचे काम सुरु आहे. तसेच त्यांच्या संपर्कात कोण कोण आले होते याची देखील माहिती घेतली जात आहे.