रत्नागिरी:- सातत्याने कोरोना रुग्णसंख्या वाढत असलेल्या रत्नागिरीला शनिवारी रात्री आणखी एक धक्का बसला. मिरज वरून प्राप्त झालेल्या अहवालानुसार 13 नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 145 झाली आहे.
जिल्ह्यातील कोरोना बधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. मुंबईतून जिल्ह्यात दाखल झालेल्या चाकरमान्यांचे अहवाल पॉझिटीव्ह येत आहेत. मागील काही दिवसात जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण संख्येने मोठी उसळी घेतली आहे. जिल्ह्यात जवळपास 62691 जण संस्थात्मक आणि होमक्वारंटाईन आहेत. त्यामुळे यापुढेही कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात भर पडण्याची शक्यता आहे.