कोरोना बाधितांची संख्या दिडशेपार; आणखी सहाजण कोरोना पाॅझिटीव्ह

रत्नागिरी:- मिरज येथून नुकतेच 27 अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये रत्नागिरी येथील 20 आणि कळंबणी येथील 1 अहवाल असे एकूण 21 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कळंबणी येथील 6 अहवाल पॉझिटिव्ह आले असून आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 151 वर पोचली आहे.
 

पॉझिटीव्ह आलेल्यांमध्ये खेड येथील एकाच कुटुंबातील 4 जणांचा समावेश आहे. हे सर्व मुंबई येथून दाखल झाले होते व त्यांना ताप असल्याने क्वारंटाइन खाली ठेवण्यात आले होते.  यात 2 स्त्री व 2 पुरुष असे रुग्ण आहेत.

अन्य दोन पुरुष रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. हे देखील मुंबई आणि ठाणे येथून आलेले आहेत यातील ठाणे येथून आलेल्या युवकाचे गाव वरावली हे आहे. तर मुलुंड येथून आलेल्या रुग्णाचे गाव दयाल (तालुका खेड) हे आहे