कोरोनामुक्त जिल्ह्याची कोरोनायुक्त जिल्ह्याकडे वाटचाल; आणखी 5 कोरोना बाधित

रत्नागिरी:- जिल्ह्यात आणखी पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मागील काही तासात 11 तर गेल्या 24 तासात 24 अहवाल पॉझिटीव्ह आले असून आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या 156 झाली आहे. कोरोनामुक्त जिल्हा आता कोरोनायुक्त जिल्ह्याकडे वाटचाल करत आहे.

प्राप्त ताज्या अहवालानुसार पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यातील 2 रुग्ण वनझोळी या गावातील असून एक रुग्ण ताडेजंभारी तालुका गुहागर येथील आहे. एक रुग्ण पांगरी देवरूख येथील असून अन्य एक रुग्ण लाजुळ तालुका लांजा येथील आहे. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 156 इतकी झाली आहे

जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णसंख्येने दिडशतक पार केली आहे. मोठया संख्येने चाकरमानी कोकणात दाखल होत आहेत. या चाकरमान्याना होम क्वारंटाईन केले जात आहे. लक्षणे असलेल्या चाकरमान्यांचा नमुना तपासणीसाठी पाठवला जात आहे. मागील काही दिवसात कोरोना बधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून बाधित रुग्ण हे मुंबईकर असल्याचे निष्पन्न झाले आहे.