रत्नागिरी :- तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील श्रींच्या मंदिरात कोकणातील फळांचा राजा हापूस आंब्याची आरास मंदिराचे मुख्य पुजारी अमित घनवटकर यांनी केली.श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे नेहमीप्रमाणे पहाटे मंदिर उघडून श्रींची पूजाअर्चा अभिषेक होऊन आरती करण्यात येते. मंदिरात फुले, मोदक, पणत्या आदी विविध प्रकारे सजावट व आरास करण्यात येते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. पण प्रतिवर्षाप्रमाणे शुक्रवार, २२ रोजी पहिल्यांदाच श्रीला कोकणचा राजा हापूस आंब्याची सजावट व आरास मंदिराचे मुख्य पुजारी अमित घनवटकर यांनी केली. लॉकडाऊन काळात मंदिर बंद असल्याने ही सजावट व आरास भक्तांना पाहता आली नाही.