किल्ला परिसरात आगीचे तांडव

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील रत्नदुर्ग किल्ल्यावर पुन्हा एकदा वणवा लागला आहे. सायंकाळ नंतर हा वणवा लागला असून हळूहळू या वणव्याने उग्र रूप धारण केले आहे. या भागात आगीचे तांडव सुरू झाले आहे. मांडवी किनाऱ्या वरून ही आग दिसत आहे. आग विझवण्यासाठी रनप ची अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. 1 बंब घटनास्थळी रवाना झाला असून दुर्गम भागामुळे आग विझवण्यात अडचणी येत आहेत.