रत्नागिरी:- जिल्ह्यात होम क्वारंटाईनमध्ये असलेल्यांची संख्या वाढून 62 हजार 552 वर पोचली आहे. होम क्वारंटाईन मध्ये असणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
जिल्ह्यात तपासणीसाठी 5 हजार 180 नमुने घेण्यात आले होते. यापैकी 132 नमुने पॉझिटीव्ह आले आहेत तर 4 हजार 604 नमुने निगेटिव्ह आले आहेत. प्रलंबित असलेल्या नमुन्यांची संख्या 436 आहे.
जिल्ह्यात येण्यासाठी अर्जांची संख्या 46 हजार 445 तर जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी अर्जांची संख्या 56 जर 863 जणांनी अर्ज केला आहे.जिल्ह्यात आज अखेर होम क्वारंटाईन असणाऱ्यांची संख्या 62 हजार 552 तर संस्थात्मक क्वारंटाईन खाली असणाऱ्यांची संख्या 139 इतकी आहे. परप्रांतातून आलेल्या आणि जिल्हयात थांबलेल्या व्यक्तींसाठी जिल्हयात 63 निवारागृहे सुरु करण्यात आली आहेत. यात 58 जणांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.जिल्हयात विविध ठिकाणी असलेल्या 9 जणांच्या जेवणाची व्यवस्था, शिवभोजन थाळी, तहसिल कार्यालये आणि NGO च्या माध्यमातून करण्यात आली आहे.