रत्नागिरी:- कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नव्याने सहा रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 42 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनाच्या दबावाखाली असलेल्या रत्नागिरीकरांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालय येथून सहा कोरोना बाधित रुग्णांना आज उपचारानंतर बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. बरे झालेले सहा रुग्णांमध्ये साखरतर येथील दोन रुग्ण नाखरे येथील आणि एक रुग्ण मेर्वी येथील आहे. यामुळे आता घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 42 झाली असून ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आता केवळ 85 झाली आहे.
आज घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांमध्ये तीन महिला असून तीन पुरुष आहेत या व्यतिरिक्त एका महिलेने सोबत रुग्णालयात असणाऱ्या 16 महिन्यांच्या मुलाला ही आज घरी जाता आले.