जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या सव्वाशेवर

रत्नागिरी:- कामथे आणि जिल्हा रुग्णालय या ठिकाणी रुग्णाच्या नावाची वेगळी नोंद झाल्याने कोरोना पॉसिटीव्ह रुग्णाबाबत गोंधळ निर्माण झाला. मात्र अखेर हा गोंधळ दूर करण्यात यश आले असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 125 वर पोचली आहे तर होम क्वारंटाईन मध्ये असणाऱ्यांची संख्या 52 हजार 922 इतकी झाली आहे.

मिरज येथून गुरुवारी प्राप्त अहवालामध्ये आलेले नाव कामथे येथील एका रुग्णाचे दाखविले होते तथापि कामथे येथून  येथील जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यालयास वेगळेच नाव पाठविण्यात आले होते.  त्यामुळे आडनाव भिन्नतेचा प्रश्न आला. यावर कामथे रुग्णालयातून माहिती पाठविताना दोन्हीकडे वेगळी आडनावे पाठविली असल्याचे मान्य करण्यात आले.  सदर व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.  मात्र आडनावातील गोंधळामुळे गुरुवारी जाहीर आकडेवारीत एकूण कोरोना पॉझिटिव्ह संख्येत त्या रुग्णाचा समावेश करण्यात आला नव्हता.  हा समावेश याबाबतची माहिती घेतल्याने शुक्रवारी यरुग्णाचा नावाचा समावेश करण्यात आला त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एकने वाढून 125 झाली आहे. जिल्ह्यात आज अखेर होम क्वारंटाईन असणाऱ्यांची संख्या  52 हजार 922 तर संस्थात्मक क्वारंटाईन खाली असणाऱ्यांची संख्या 139 आहे.