जिल्ह्यात आढळले कोरोनाचे 11 रुग्ण ; एकूण रुग्णसंख्या 124 वर

रत्नागिरी :- सातत्याने रुग्णसंख्या वाढत असलेल्या रत्नागिरीला गुरुवारी रात्री आणखी एक धक्का बसला. काल सकाळीच 7 रुग्ण सापडल्याची माहिती प्रशासनाकडून दिल्यानंतर त्यात रात्री आणखी 11 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 124 वर गेला आहे. प्राप्त 17 कोरोना अहवालांपैकी 11 नवे रुग्ण तर 6 जणांची दुसरी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.