कोरोनाचा जिल्ह्यात चौथा तर चिपळुणात पहिला बळी

रत्नागिरी :- चिपळूण तालुक्यात कोरोनाचा पहिला तर जिल्ह्यात चौथा बळी गेला आहे. नारद खेरकी येथील कोरनाबाधित महिलेचा दोन दिवसापूर्वी मृत्यू झाला. ही महिला मुंबईहून गावी आली होती. ती पॉझिटिव्ह आढळल्यानंतर तिला रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले होते तिथे तिचा मृत्यू झाला.

चिपळूण तालुक्यात एकूण आठ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत यातील पाली कळंबस्ते आणि तळसर येथे आढळलेले रुग्ण बरे झाले आहेत उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे दोन दिवसांपूर्वी  कापरे येथील तीन आणि कोसंबी येथील एक असे चार रुग्ण पॉझिटिव्ह आढळले त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.