कोरेची पीआरएस काउंटर सुरू; रत्नागिरीतील प्रवाशांची तिकिटांसाठी धाव

रत्नागिरी:- कोकण रेल्वेची विविध शहरातील 15 पीआरएस काउंटर शुक्रवारपासून (ता. 22) सुरू झाली असून त्या ठिकाणाहून परराज्यात जाण्यासाठी तिकिटे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. रत्नागिरी रेल्वेस्थानकावरील तिकिट काऊंटरवर काही लोकांनी धाव घेतली होती.

कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर देशभरात केलेल्या टाळेबंदीमुळे कोकण रेल्वेची प्रवासी वाहतूक थांबलेली होती. त्यामुळे सर्वच तिकिट विक्री केंद्र बंद ठेवण्यात आली होती. विविध शहरातील पीआरएस काऊंटर ही बंद होते. टाळेंबदीचा चौथा टप्पा देशात सुरु झाला असून त्यात प्रवासी वाहतूकीली अटी व शर्थी टाकत परवानगी दिली गेली आहे. त्यानुसार रेल्वे मंत्रालयाने काही गाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात तीन गाड्या कोकण रेल्वे मार्गावरुन धावतील. त्यासाठी शुक्रवारपासू विविध शहारातील पीआरएस काउंटर सुरू करण्यात आली आहेत. त्यात माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, थिविम, करमाळी, मडगाव, कारवार, उडप्पी, कुमटा बेंदूर येथील कोकण रेल्वेचे काउंटर सुरू झाली आहेत.

महाराष्ट्रात आंतरजिल्हा किंवा आंतरराज्यात प्रवास करण्याची मुभा नाही. त्यामुळे रत्नागिरीतून पराज्यात जाणार्‍यांना याचा लाभ मिळणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातून दुसर्‍या राज्यात जाण्यासाठी प्रवासी नेहमीप्रमाणेच तिकिटांचे आरक्षण करता येणार आहे. ज्यांनी तिकीटे आरक्षित केली असतील त्यांना तिकिटाची संपूर्ण रक्कम परत करता येणार आहे.