आणखी सातजण कोरोना बाधित; रुग्णसंख्या 132 वर

रत्नागिरी:- मिरज येथून शुक्रवारी 455 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकीं 448 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 7 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आलेल्या अहवालात गुहागर तालुक्यात शृंगारतळी येथील 2, दापोली तालुक्यात देवके बुद्रुक येथील 2, रत्नागिरी तालुक्यात लावगण व खानवली येथील 2 आणि संगमेश्वर 1 असे पाॅझिटीव्ह अहवाल आले आहेत. यानंतर एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची जिल्ह्यातील संख्या 132 वर पोचली आहे. यापैकी ॲक्टिव पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 91 असून उपचारानंतर घरी सोडलेले रुग्ण 37 आहेत तर 4 जणांचा मृत्यू झाला आहे.