ना. उदय सामंत स्वखर्चातून देणार जिल्ह्यातील सरपंचांना विमा संरक्षण

रत्नागिरी :- जिल्ह्यात कोरोनाचा मुकाबला करण्यात ग्रामस्तरावर सरपंचांचा मोलाचा वाटा आहे. या सरपंचांसाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्वखर्चाने विमासंरक्षण देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

राज्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच निर्णय आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाले आहेत, या सर्वाना होम क्वांरटाईन करण्यात आलेले आहे. या सर्वांची काळजी ग्रामस्तरावर ग्राम कृती दलावर आहे. या कोरोना विरुध्दच्या लढ्यात सरपंचांची कामगिरी अतिशय मोलाची आहे. याच जाणिवेतून या सर्वांना आपण स्वखर्चाने विमा संरक्षण देणार असल्याचे ना. उदय सामंत यांनी कळविले आहे.