जिल्ह्यात 47 हजार 609 जण होम क्वारंटाईन

रत्नागिरी:- जिल्ह्यात होम क्वारंटाईन करण्यात येणाऱ्यांची संख्या दररोज मोठ्या संख्येने वाढत आहे. परजिल्ह्यासह मुंबईतून येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत होम क्वारंटाईन असणाऱ्यांची संख्या 47 हजार 609 इतकी होती. जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या वाढून 113 वर पोचली आहे.

मुंबईकर चाकरमानी मोठ्या संख्येने जिल्ह्यात दाखल होत आहेत. यामुळे कोरोना बाधितांची संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत सापडलेल्या कोरोना बाधितांपैकी सर्वाधिक रुग्ण मुंबईकरच आहेत.
 जिल्ह्यात तपासणीसाठी 4 हजार 885 नमुने घेण्यात आले होते. यापैकी 113 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर 4 हजार 389 नमुने निगेटिव्ह आले आहेत. अद्याप 375 अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यात येण्यासाठी अर्जांची संख्या  45 हजार 442 तर जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी अर्जांची संख्या 55 हजार 730 आहे. जिल्ह्यात होम क्वारंटाईन असणाऱ्यांची संख्या 47 हजार 609 तर  संस्थात्मक क्वारंटाईन खाली असणाऱ्यांची संख्या  २२९ आहे.
परप्रांतातून आलेल्या आणि जिल्ह्यात थांबलेल्या व्यक्तींसाठी जिल्हयात 63  निवारागृहे सुरु करण्यात आली आहेत. यात 58  जणांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.