रत्नागिरी:- दोन दिवस रत्नागिरीकरांना दिलासा मिळाल्यावर आज सकाळीच रत्नागिरीकरांच्या चिंतेत भर पडली आहे. नुकत्याच प्राप्त झालेल्या कोरोना अहवालामध्ये तब्बल 16 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 108 झाली आहे.
रात्रीपासून मिरजेतून एकूण 82 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 66 अहवाल निगेटिव्ह आले असून 16 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील नर्सिंग होस्टेल 4, कर्ला 1, धामणसे 1 असे एकूण 6 रुग्ण, संगमेश्वर तालुक्यात धामापूर 2, कोळंबे 2, भिर्कोंड 1, फणसवणे 1 असे एकूण 6 रुग्ण, गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील 4 रुग्ण असे एकूण 16 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामधील सर्व व्यक्ती विलगीकरणात मध्ये होत्या. यातील बहुतेक जणांचा मुंबई प्रवासाचा इतिहास आहे.