रत्नागिरी:- कोरोनावर यशस्वीरित्या मात करुन उपचार पूर्ण केलेल्या 16 जणांना मंगळवारी रुग्णालयामधून घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या आता 33 झाली आहे.
जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 92 सापडले. यापैकी 33 जणांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली आहे. तर 3 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत 56 कोरोना बाधित रुग्णावर उपचार सुरू आहेत दरम्यान मिरज येथून मंगळवारी सकाळी 108 अहवाल प्राप्त झाले. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये रत्नागिरीतील सर्वाधिक 74, संगमेश्वर 18, गुहागर 13 आणि मंडणगड तालुक्यातील 3 अहवाल आहेत.