रत्नागिरी:- लॉकडाऊनच्या कालावधीत अडकलेल्या कामगारांना कोकण रेल्वेने मदतीचा हात दिला आहे. 16 आणि 17 मे या दोन दिवसात 2 हजार 826 कामगारांची कोकण रेल्वेने वाहतूक करण्यात आली. कोकण रेल्वेच्या मदतीने अनेक कामगारांना आपल्या घरचा रस्ता सापडला आहे.
कोरोनामुळे लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली.जवळपास दोन महिने लॉकडाऊन कायम राहिल्याने परप्रांतीय मजुरांचे प्रचंड हाल झाले. अनेकांनी पायी चालत आपले गाव गाठण्यासाठी धडपड सुरू केली.या कालावधीत कोकण रेल्वेने या कामगारांना मदतीचा हात दिला.
16 आणि 17 मे या कालावधीत 2 हजार 826 कामगारांची वाहतूक करण्यात आली आहे. यात 786 कामगार जिल्ह्यात आले तर 4 हजार 40 कामगार जिल्ह्यातून आपल्या गावी पोहचले. यात दिल्ली ते मडगाव, पुणे ते हिमाचल प्रदेश, रत्नागिरी ते बिहार, पुणे ते तामिळनाडू अशा रेल्वे सोडण्यात आल्या होत्या.