रत्नागिरीकरांना दिलासा; 115 अहवाल निगेटीव्ह

रत्नागिरी:- मिरज येथे पाठवलेल्या तपासणी नमुन्यांपैकी 115 अहवाल प्राप्त झालेले आहेत. प्राप्त झालेले सर्व 115 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामुळे रत्नागिरीकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. प्राप्त झालेले सर्व 115 अहवाल दापोली येथील आहेत. मागील काही दिवसांपासून मुंबईकर चाकरमानी मोठ्या प्रमाणावर कोकणात दाखल झाले आहेत. रत्नागिरीत दापोली, खेड मंडणगड येथे येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी आहे. अशातच 115 अहवाल निगेटिव्ह आल्याने काही प्रमाणात दिलासा देणारी घटना घडली आहे.