आणखी सहाजण कोरोना बाधित; एकूण रुग्णसंख्या शतकानजिक

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना बधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. रविवारी रात्री आणखी सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या पाच पैकी एक कळंबनी तर दापोलीतील पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 92 झाली आहे.
रविवारी सकाळपासून जिल्ह्यातील 270 अहवाल मिरज येथून प्राप्त झाले आहेत यापैकी 264 अहवाल निगेटिव्ह आहेत तर कळंबणी येथील एक व दापोली येथील पाच अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत पॉझिटिव्ह अहवालातील एक रुग्ण मुरडव येथील असून चार रुग्ण कोंडे शिवगण या गावातील तर एक रुग्ण कोलतर कोंड या गावातील आहेत. सातत्याने वाढणाऱ्या कोरोना बाधित रुग्ण संख्येने जिल्हावासीय धास्तावले असून जिल्ह्याची कोरोना बाधितांची संख्या शतकानजिक आहे.