‘राजधानी’चे प्रवासी उतरले रत्नागिरीत; आरोग्य यंत्रणा सतर्क

रत्नागिरी :- विविध राज्यात जाण्याकरिता केंद्राने विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे मडगावकडे जाणारी राजधानी एक्स्प्रेस आज रत्नागिरी स्थानकात १०.४० मिनिटाने दाखल झाली. रत्नागिरी स्थानकात ३०० ते ४०० लोक उतरल्याची माहिती उपलब्ध होत आहे.
चाकरमानी कोकणात येण्यासाठी मिळेल तो मार्ग स्वीकारत आहेत.केंद्राने शासनाने विविध राज्यात थेट जाण्याकरिता काही विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे दिल्ली ते मडगावकडे जाणारी राजधानी एक्स्प्रेस आज रत्नागिरी स्थानकात १०.४० मिनिटाने दाखल झाली.या गाडीला रत्नागिरी स्थानकावर तांत्रिक कारणाकरिता काही मिनिटांचा थांबा होता असे समजते. त्या वेळी रत्नागिरी स्थानकात ३०० ते ४०० लोकं उतरल्याची माहिती उपलब्ध होत आहे. उतरलेल्या लोकांची मात्र रितसर अर्ज भरून माहिती व तपासणी करण्यात येत आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणा कार्यरत आहे.
या प्रवाशांनी मडगावपर्यंत तिकीट काढून रत्नागिरीत उतरले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उद्याही एक ट्रेन नवी दिल्ली येथून मडगावला जाणार आहे. या ट्रेनला रत्नागिरी स्थानकात अधिकृत थांबा आहे का? थांबा नसेल तर एवढ्या मोठ्या प्रमाणात पँसेजर रत्नागिरीला उतरलेच कसे. रेल्वे प्रशासनाला याची कल्पना होती काय, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होवू लागले आहेत. दरम्यान रत्नागिरी रेल्वे स्थानकावर पोलीस व आरोग्य यंत्रणा दाखल झाली आहे.