रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यावर दिवसेंदिवस कोरोनाची पकड घट्ट होत आहे. नियमितपणे कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत भर पडताना दिसत आहे. आज मिरज येथे पाठवलेल्या कोरोना तपासणी नमुन्यांपैकी 4 अहवाल प्राप्त झालेले आहेत, हे सर्व 4 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
यातील 3 रुग्ण कामथे येथे तर 1 रुग्ण कळंबणी येथे संस्थात्मक क्वारंटाइन होते. कामथे येथील 3 रुग्ण कापरे, तालुका चिपळूण येथील रहिवासी असून कळंबणी उपकेंद्रातील रुग्ण हा संगमेश्वर येथील रहिवासी आहे. या चारही जणांचा मुंबई प्रवासाचा इतिहास आहे. यामुळे आता जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 86 झाली आहे