रत्नागिरीत आणखी पाचजण कोरोनाग्रस्त; बाधितांची संख्या 82 वर

रत्नागिरी :- आज दिवसभरात 152 कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यावर संध्याकाळी उशीरा 5 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले. यातील 4 अहवाल कळंबणी उपकेंद्रांतर्गत खेडमधील 2 व दापोलीतील 2 असून 1 राजापूरमधील आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 82  झाली आहे. जिल्ह्यात गेले काही दिवस सलग कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. काल रात्री 3 रुग्ण सापडले होते. दिवसभर तब्बल 152 अहवाल निगेटिव्ह आल्यावर संध्याकाळी 5 रुग्णांची भर पडली. मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने प्रशासनासह नागरिक देखील चिंतेत सापडले आहेत.