रत्नागिरी:- लॉकडाऊन पासून बंद असलेली वाईन शाॅप अखेर शुक्रवार पासून खुली झाली. तब्बल 56 दिवस दारूची दुकाने बंद होती. अखेर उघडणार… उघडणार म्हणता म्हणता अखेर वाईन शॉप्स सुरू झाली. शुक्रवारी दारूची दुकाने उघडण्यापूर्वीच मद्यप्रेमींनी दुकानांबाहेर रांग लावली होती. सोशल डिस्टन्स पाळत आणि सर्व नियमांची अंमलबजावणी करत अनेकांनी दारू खरेदी केली.
लॉकडाऊनच्या काळात तब्बल 56 दिवसांपेक्षा अधिक काळ मद्याची दुकाने बंद राहिली. या कालावधीत राज्य शासनाने मद्याची दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला. परंतु अनेक जिल्ह्यात दारू दुकानांवर मोठी गर्दी झाली. यामुळ्ये जिल्ह्यात आद्यापपर्यंत दारूची दुकाने उघडली नाहीत. मध्यंतरी ऑनलाईन दारू विक्री करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. परंतु अवघ्या काही तासात हा निर्णय मागे घेण्यात आला होता. ऑनलाईन विक्रीचा निर्णय मागे घेत दुकानांमध्येच मद्य विक्रीची मुभा देण्यात आली. मात्र शहरात मद्य विक्री दुकाने उघडण्यात अडचणी आल्या. ग्रामीण भागातील शॉप्स मात्र सुरू झाले. परंतु शहरातील दुकाने शुक्रवार पासून सुरू झाली. ऑनलाईन आणि थेट दुकानांत मद्य विक्री सुरू झाली. मद्यपींनी देखील मद्याची दुकाने उघडण्यापूर्वीच दुकानांबाहेर रांग लावली. सोशल डिस्टन्स पाळत अनेकांनी दारू खरेदि केली.