जिल्ह्यात कोरोनाचे 3 नवे रुग्ण, रुग्णसंख्या झाली 77

रत्नागिरी :- मिरज येथून गुरुवारी रात्री उशिरा 74 अहवाल प्राप्त झाले आहेत. प्राप्त अहवालांत 3 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनाचे तीन नवे रुग्ण सापडल्याने रुग्ण संख्या 77 वर पोहचली आहे. दररोज कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. पॉझिटीव्ह सापडणारे बहुतांश रुग्ण हे मुंबई आणि पुण्यातील चाकरमानी आहेत. येणाऱ्या कालावधीत मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल होणार असल्याने कोरोना बाधित रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान गुरुवारी रात्री आलेल्या अहवालानुसार 3 पॉझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. यामध्ये रत्नागिरी नर्सिंग हॉस्टेल 1 आणि संगमेश्वर तालुक्यातील देवळे 1 व भडकंबा मधील 1 रुग्ण आहे. जिल्ह्यातील 77 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ऍक्टिव्ह 69 रुग्ण आहेत, 5 जण कोरोना मुक्त झाले असून तिघांचा मृत्यू झाला होता.