दापोलीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पसार

रत्नागिरी:- दापोलीत पॉझिटीव्ह अहवाल आलेल्या रुग्णाला पुढील उपचारासाठी नेण्याकरिता रुग्णवाहिका दाखल झाली. मात्र पॉझिटीव्ह रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल न होता पळून गेल्याची घटना दापोली तालुक्यात घडली आहे. 

काल दापोलीत 4 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते. क्वारंटाईन असलेल्या रुग्णांना उपचारासाठी आणायला रुग्णवाहिका गावात गेल्या. संकुर्डे आणि सडवे येथील रुग्ण घेऊन आले. पण तालुक्यातील बोरिवली वरची वाडी येथे शाळेत रूग्णवाहिका गेल्यावर तिथल्या क्वारंटाईन रुग्णाला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु झाली. लघुशंकेला जाऊन येतो असे सांगून तो पळून गेला. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याने त्याला पकडणार कसं अशी स्थिती उपस्थितांची झाली. त्या पॉझिटिव्ह रुग्णाचा शोध सध्या सुरू आहे.