वाढणाऱ्या केसेस लक्षात घेता रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना तपासणी लॅब सुरू करा:-सुहास खंडागळे

गाव विकास समिती,रत्नागिरी जिल्हा संघटनेची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी

रत्नागिरी:-मुंबईतून येणाऱ्या नागरिकांची वाढती संख्या,तपासणी साठी मोठ्या संख्येने घेतले जाणारे संशयितांचे नमुने व मिरज येथून उशिरा येणारे तपासणी अहवाल लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना तपासणी लॅब सुरू करावी अशी मागणी गाव विकास समिती,रत्नागिरी जिल्हा संघटनेच्या वतीने संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाला या मागणी बाबत गाव विकास समितीच्या अधिकृत ट्विटर हँडल वरून ट्विट करण्यात आले असून यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील वाढती कोरोना बधितांची संख्या,तपासणी साठी घेतले जाणारे नमुने व मिरज येथून तपासणी अहवाल येण्यास होणारा विलंब लक्ष्यात घेऊन कोकणासाठी रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना तपासणी लॅब सुरू करावी अशी मागणी गाव विकास समितीच्या वतीने करण्यात आली आहे.