रत्नागिरी:- कोरोना पासून मिळालेला दिलासा रत्नागिरीकरांसाठी अवघ्या काही तासांचा ठरला आहे. नुकतेच कोरोनाचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असून एकाचवेळी 22 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. एकाच दिवशी एवढे मोठ्या प्रमाणावर रुग्ण मिळाल्याचे पहिलांदाच घडत आहे. बाधित रुग्णांमध्ये सर्वधिक 11 जण मंडणगड मधील, 7 जण रत्नागिरी तर 4 जण दापोलीतील आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बधितांची संख्या 74 वर पोहचली आहे.
रत्नागिरीत सापडलेल्या 7 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 4 स्त्रिया असून 3 पुरुष आहेत. मंडणगडमधील 11 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 7 पुरुष व 4 स्त्रिया आहेत.तर दापोलीत सापडलेले 4 ही पॉझिटिव्ह पुरुष आहेत. त्यामुळे आता रत्नागिरी जिल्ह्यातील अॅक्टिव्ह कोरोना बाधित रुग्णांची संख्या 66 इतकी झाली आहे. 5 जण कोरोना मुक्त झाले असून तिघांचा मृत्यू झाला होता. आज आढळलेल्या कोरोना बाधितांपैकी बहुतेक जण मुंबईतून जिल्ह्यात आले आहेत. अजून अनेक अहवाल प्रतिक्षेत असून रत्नागिरी जिल्हावासीयांच्या चिंतेत भर पडली आहे.