हिवताप हंगामी क्षेत्र कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ

कोरोनामुळे हाताला नाही काम; 226 कुटुंबावर मोठे संकट

रत्नागिरी:- कोरोनामुळे अनेक कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असताना जिल्ह्यातील आरोग्य विभागातील हिवताप हंगामी क्षेत्र कर्मचार्‍यांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना काळात हाताला काम मिळावे अशी मागणी या कर्मचाऱ्यांनि केली आहे. मात्र, शासनाने या मागणीला अद्याप प्रतिसाद दिलेला नाही यामुळे 226 कुटुंबाला प्रचंड आर्थिक चणचण भासत आहे.     

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत मलेरिया, डेंगु, चिकणगुण्या साथ रोग काळात 210 आरोग सेवक रिक्त जागेवर 1999 पासून हंगामी क्षेत्र कर्मचारी काम करीत आहेत. शासनाने  मार्च 2019 ला जाहिरात देऊन 144 आरोग्य सेवक पुरूष, 126 आरोग्य सेवक महिला सरळसेवा पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवले होते. यामुळे आरोग्य विभागात कायम काम मिळेल, अशी आशा होती 
सार्वजनिक आरोग्य विभागातून भरती प्रकिया परिक्षा घेणार यावेळी महापूराचे संकट आले. या संकट काळात मोफत विनामोबदला साथरोग पसरू नये म्हणून सामाजिक बांधिलकी जपत काम केले. यानंतर लोकसभा , विधानसभा निवडणूक आली. नंतर महापोर्टल बंद आणि आता महाभयंकर कोरोना संकट आले. या संकट काळात कोरोना विषाणु साथ रोग वेळी आरोग्य विभागात मनुष्यबळ कमी आहे. येथे हंगामी क्षेत्र कर्मचारी यांना काम मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र गेले अनेक दिवसापासून आरोग्य विभाग हाताला काहीच काम देत नाही. कुठे लॉकडाऊन काळात मोलमजुरी करता येत नाही. या कर्मचारी वर्गाची भरती लवकरच करणार असे शासनाने जाहिर केले आहे. याकडे डोळे लाऊन सर्व कर्मचारी वर्ग बसला आहे. शासन व प्रशासनाने याकडे लवकरच लक्ष देऊन रिक्त असणारे जागी मार्च 2019 रोजी जे अर्ज दाखल केले आहेत हि भरती प्रकिया पूर्ण करावी, अशी मागणी हंगामी क्षेत्र कर्मचारी करीत आहेत.